महाराष्ट्र
पायाखालची जमीन सरकली की काय?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजितदादा पवार गटाला मिळाल्यानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट काहीसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशातच बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजितदादा पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, अशा लिहिलेले असलेल्या बॅनरवर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. याप्रकरणावरुन अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी संताप व्यक्त केला आहे.
पायाखालची जमीन सरकली की काय? असा प्रश्न विचारत अप्रत्यक्षरित्या खासदार सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेंकावर कधी प्रत्यक्ष तर कधी नाव घेता जहरी टीका करताना दिसत आहे. अशातच बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता. त्यांच्या या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.