देश - विदेश

देशात मोदींची लोकप्रियता का वाढली ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकेल, कुणाला किती यश मिळेल, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पण, देशाचा मूड काय आहे, याबद्दलचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. मूड ऑफ द नेशनमधून लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे असतील, याबद्दलचे अंदाज मांडण्यात आले आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या लोकप्रियतेच्या कारणांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
इंडिया टुडे आणि सी व्होटर सर्व्हेने संयुक्तपणे एक सर्व्हेक्षण केले. हे सर्व्हेक्षण देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आले. तब्बल दीड लाख लोकांना यात सहभागी करून घेण्यात आले.
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी पाच टक्के लोकांचे मत आहे की, भ्रष्टाचार लगाम लावणे, हे मोदींच्या लोकप्रियतेचे कारण आहे.
सहा टक्के लोकांचे म्हणणे आहे की, कोरोना काळात मोदी सरकारने चांगले काम केले.
12 टक्के लोकांना वाटते की, जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली. 19 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उजळली. भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 परिषदेमुळे मोदींची लोकप्रियता वाढली.
मोदींच्या लोकप्रियतेच्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे राम मंदिर. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 42 टक्के लोकांनी असे मत मांडले की, अयोध्येत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर उभारल्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली. सर्व्हेंमधील आकड्यानुसार राम मंदिर उभारण्याचा मुद्द्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली. जवळपास निम्म्या लोकांचे मत तसेच आहे. त्यामुळे या मुद्द्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसू शकतो. 

Related Articles

Back to top button