खेळ

ब्रेकिंग! टीम इंडियाचा पलटवार

  • टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने आज इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
    या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते, यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २९२ धावांवर गारद झाला.
    दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना आता राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
    टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. बुमराहने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या. तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

Related Articles

Back to top button