क्राईम

प्रियकराची डबल सेटिंग

  1. राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरत असून प्रेयसीला टाळत होता. याचा जाब विचारल्यास तो मित्रांसमोरच मारहाण करत असल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
  2. ही घटना पुण्यात पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी येथे आयआयएमएस महाविद्यालयाच्या मुलींच्या डेल्टा हॉस्टेलमध्ये घडली असून मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावर या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    गुडीया कुमारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अश्वनी भारद्वाज (रा. रंजित सिंह, डुमरी, लखीसराय, बिहार) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याबाबत मयत मुलीचे वडील भोलासिंग परमात्मा प्रसाद सिंग (वय ४८ रा. मसत्थुता-बाड, जि. पटना बिहार) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडीया कुमारी ही हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होती. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गुडिया आणि अश्वनी यांचे प्रेमसंबंध होते. पण अलीकडे काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा आला होता.
    अश्वनी हा गुडीयाला अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच त्याचे दुसऱ्या एका मुलीशी सूत जुळले होते. तो तिच्यासोबत फिरत होता. ही बाब गुडीया हिला कळल्यावर तिने त्याला जाब विचारला. मात्र, अश्विनीने गुडीया हिला तिच्या मैत्रिणींसमोर मारहाण केली. हा प्रकार अनेक वेळा झाला. तो तिचा अपमान करीत होता. तू मरून जा. मला काही फरक पडत नाही, असे तिला सारखे म्हणत होता. या प्रकाराला कंटाळून गुडीयाने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related Articles

Back to top button