राजकीय

ब्रेकिंग! अजितदादा ‘अ‍ॅक्शन मोड’वर

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय जाहीर केला. पक्ष आणि चिन्ह अजितदादा गटाचेच असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. काल जाहीर झालेल्या निकालावर अजितदादा गटातील सर्वच नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. अशात आता पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.
पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजितदादा यांनी, नेते, पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली. देवगिरीवर काल झालेल्या बैठकीत अजितदादा यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाले आहे. त्याचा सर्वांनी मान राखा. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा. पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना अजितदादा यांनी दिल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजितदादा यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पत्र देणार आहे. अजितदादा यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी पत्रात करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button