क्राईम
बाप रे! मुलीने आईच्याच घरात टाकला दरोडा

- चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ३१ वर्षीय महिलेने तिच्या आईच्याच घरात चोरी केली आहे. उत्तम नगरमधील मोहन गार्डन परिसरात ही घटना घडली. तिला कोणी ओळखू नये म्हणून तिने बुरखा घालून ही चोरी केली आहे.
- दिल्ली पोलिसांनी या महिलेला तिच्या आईच्या घरातून दागिने चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला पैशांची गरज होती आणि आईकडून मला जास्त प्रेम मिळत नाही, म्हणून हे पाऊल उचलल्याचे महिलेने सांगितले आहे.
या महिलेने आईच्या घरातून पंचवीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ही घटना दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे. घरफोडी विरोधी सेलने पुराव्यांचा आढावा घेतला. त्यानंतर आरोपी महिलेचे बिंग फुटले आहे. आरोपीवर कर्ज असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान चौकशीमध्ये या महिलेने आपला गुन्हा कबुल केला आहे.