मनोरंजन

पूनम पांडे पुन्हा चर्चेत

सध्या अभिनेत्री पूनम पांडे चर्चेत आहे. शुक्रवारी पूनमच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. पूनमच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांसह बॉलिवूड हादरले होते. पण रविवारी पूनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्या पूनमवर टीका केली जात आहे. तसेच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पूनमची शाळा घेतली. अशामध्ये आता पूनमने ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. पूनमने सांगितले की, तिने हे पब्लिसिटी स्टंटसाठी केले नाही आणि कोणत्याही औषध कंपनीचा यात सहभाग नाही. तिला फक्त सर्व्हायकल कॅन्सरबद्दल लोकांना जागरुक करायचे होते. तिने सांगितले की, मी माझ्या आईला घशाच्या कर्करोगाशी झुंज देताना पाहिले आहे. हे खूप कठीण आहे. मी हे सर्व केल्यानंतर आता लोक गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर खूप बोलत आहेत. यानंतर लोक खूप जागरूक होत आहेत.

Related Articles

Back to top button