ब्रेकिंग! भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा कांड

Admin
1 Min Read

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जयत तयारी केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून पुन्हा एकदा गदारोळ झाला आहे. आसाममध्ये राहुल गांधीसोबत निघालेले काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. यात्रा रोखल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान उत्तर-पूर्व आसाममधील गुवाहाटीमध्ये पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. शहरात एन्ट्री न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा झाला. या यात्रेला शहरातील रस्त्यावरुन प्रवासाला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर राहुल गांधींच्या यात्रेचा प्रवास शहराच्या आत फिरत होता. यामुळेच नंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि परिणामी राहुल गांधींसोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

Share This Article