सोलापूर

ब्रेकिंग! श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ; सोलापुरात दगडफेक

सोलापूर (प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठापना निमित शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शास्त्री नगरात मिरवणुकीत निघालेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. यात चौघे जखमी झाले तर काही वाहनाची तोडफोड झाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दुपारी साडेपाच नंतर सर्व जनजीवन पूर्ववत झाले.
मल्लिकार्जुन सिद्राम शिंपी (वय-३०,रा.विजापूर नाका झोपडपट्टी,सोलापूर) स्वामी सत्यनारायण निमकंठी (रा.नवीन विडी घरकुल,सोलापूर) जयराज नागेश गावंडे (वय-२१,रा.संजय गांधी नगर,विजापूर रोड,सोलापूर) नागेश लिंगाप्पा हत्तुरे (रा.विजापूर रोड,सोलापूर) हे चौघेजण जखमी झाले.
यापैकी दोघा जणावर खाजगी रुग्णालयात तर दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.सदर बझार पोलीस ठाणे पथकाला ही घटना कळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब त्या ठिकाणी बंदोबस्त पाठवण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या करिता शास्त्रीनगर, मौलाली चौक याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत सदर बझार पोलीस प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेऊन संशयीतांचा शोध चालू होता.

Related Articles

Back to top button