देश - विदेश
ब्रेकिंग! संपूर्ण देशात दिवाळी साजरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक सोहळा पार पडला आहे. अभिजीत मुहूर्तावर ठरलेल्या वेळी मोदी यांच्या हस्ते वेद विद्वानांनी रामलल्लाच्या प्रतिमेचा अभिषेक विधी पार पाडला. यानंतर मोदींनी 11 दिवसांचा आपला उपवास सोडला.
पण मोदींना पाणी देऊन उपोषण तोडणारे संत कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अयोध्येत राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली असून राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले आहेत. पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी, शंखनाद आणि जय श्रीरामाच्या घोषणांमध्ये प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
रामलल्ला अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत गर्भगृहात उपस्थित होते.
दरम्यान या सोहळ्यानंतर संपूर्ण देश दिवाळी साजरी केली जात आहे. मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना हा सणसणीत टोला आहे. सोलापुरात देखील जणू दिवाळी असल्यासारखे वातावरण आहे.