सोलापूर
सोलापुरात जमाव जमवून शांतता भंग केली
सोलापूर (प्रतिनिधी) बेकायदेशीर जमाव जमवून शांतता भंग केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास होम मैदान येथील बंदगी वडापाव हॉटेल समोर घडली.याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल तिमिर चंद्रकांत गायकवाड नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बिलाल यासीन बागवान,शबाना बिलाल बागवान,अमन बिलाल बागवान,आजाद बिलाल बागवान (सर्व रा.मित्र नगर), चांदबी अल्ताफदिलावर बागवान,मेहबुब शब्बीर बागवान,अनवर अख्तर सय्यद (रा.रेहमतबी टेकडी,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस नाईक माडे हे करीत आहेत.