बिजनेस

होंडाची पॉवरफुल बाईक लॉन्च

  • होंडा Motorcycle & Scooter India ने भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच कंपनीने भारतात NX500 ॲडव्हेंचर टूरर बाईक लॉन्च केली आहे. जी थेट Kawasaki Versys 650 शी स्पर्धा करेल.
    होंडाच्या लाइनअपमधील CB500X ची जागा घेण्यासाठी ही बाईक पूर्णपणे तयार आहे. बाजारात ही बाईक Kawasaki Versys 650 शी स्पर्धा करेल.
    Honda NX500 ला CB500X सारखेच इंजिन देण्यात आले आहेत. जे लिक्विड-कूल्ड 471 cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे. बाईक 4-स्ट्रोक DOHC डिझाइनसह 8,600 rpm वर 46.5 bhp चा पॉवर आउटपुट आणि 6,500 rpm वर 43 Nm चा पीक टॉर्क देते.  
    NX500 चे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर बाईक ग्रँड प्रिक्स रेड, मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल होरायझन व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Related Articles

Back to top button