देश - विदेश
ब्रेकिंग! राम मंदिर तर बांधून झाले, आता पुढे काय?
अयोध्या नगरीमध्ये आज प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या देश ‘राममय’ झाला असून राजनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत आहे. या पवित्र सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी, आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
काही लोक म्हणत होते, राम मंदिर तयार झाले तर भारतात आग लागेल. असे लोक भारताचा सामाजिक भाव समजू शकले नाहीत. राम मंदिराची उभारणी कुठली आग नाही, तर एक ऊर्जा निर्माण करत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम उपाय आहे, वाद नाही, राम ही आग नाही तर उर्जा आहे, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे, असेही मोदी म्हणाले. दरम्यान अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झाले. आता पुढे काय? असा सवाल करत मोदी यांनी उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला.
आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन मोदी यांनी केले.