ब्रेकिंग! अखेर तो क्षण आला, मी प्रभू रामांची माफी मागतो, कारण…

Admin
1 Min Read
अयोध्येतील राम मंदिराचे आज थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
आज आपले राम आले आहेत. २२ जानेवारी हा दिवस वर्षानुवर्ष लक्षात राहिल. आपले राम आता झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील, असे मोदी म्हणाले. तसेच माझे शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन आहे, असे म्हणत मोदी काही क्षण भावूक झाले.
मी आज प्रभू रामाची माफी मागतो. आमच्याकडून तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकलो नाही, आज ते पूर्ण झाले. मला विश्वास आहे की, प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील, असे मोदी म्हणाले.
Share This Article