ब्रेकिंग! रामलला प्राण प्रतिष्ठेदरम्यान मोठी घडामोड

आज रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दरम्यान अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन मे महिन्यापासून भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करणार आहे. ही मशीद पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागू शकतात.
हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखालील फाउंडेशनच्या विकास समितीद्वारे मशीद प्रकल्पाचे काम पाहिले जात आहेत. या मशिदीसाठी निधी उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइट सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव पैगंबर मुहम्मद यांच्या नावावरून ‘मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला’ असे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान शेख म्हणाले, लोकांमधील वैर आणि द्वेष दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करा अथवा नका करू, आम्हाला लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण करायची आहे. आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर हा मतभेद आपोआप संपेल, असे ते म्हणाले.