देश - विदेश

प्रियंका गांधी अडचणीत

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रथमच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा उल्लेख केला आहे. हे प्रकरण एनआरआय उद्योगपती सीसी थंपी यांच्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील आरोपी आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रियांका यांच्या अडचणी वाढू शकतात. ईडीने आपल्या आरोपपत्रात प्रथमच प्रियंका यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचे नाव आरोपी म्हणून नोंदविण्यात आलेले नाही. ईडीच्या आरोपपत्रात प्रियांकाचे नाव जमीन खरेदी प्रकरणातील आरोपींशी असलेल्या संबंधासंदर्भात नमूद करण्यात आले आहे. या आरोपपत्रात प्रियंकासोबत त्यांचा नवरा रॉबर्ट वड्रा यांच्या नावाचाही उल्लेख आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, संजय भंडारीचा कथित सहकारी सीसी थंपी याने 2005 ते 2008 या कालावधीत हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील अमीपूर गावात 486 एकर जमीन दिल्ली-एनसीआरचे रिअल इस्टेट एजंट एचएल पाहवा यांच्यामार्फत खरेदी केली होती. रॉबर्ट वाड्रा यांनी 2005-2006 मध्ये एचएल पाहवा यांच्याकडून अमीपूरमध्ये 334 कनाल (40.08 एकर) जमिनीचे 3 तुकडे खरेदी केले आणि डिसेंबर 2010 मध्ये तीच जमीन एचएल पाहवा यांना विकली.
आरोपपत्रानुसार, रॉबर्ट यांच्या पत्नी प्रियंका यांनी एप्रिल 2006 मध्ये एचएल पहवा यांच्याकडून अमीपूर गावात 5 एकर शेतजमीन खरेदी केली होती. फेब्रुवारी 2010 मध्ये हीच जमीन एच.एल.पहवा यांना विकण्यात आली. यावेळी पहवा यांना भूसंपादनासाठी रोख रक्कमही मिळत होती. वाड्रा यांनी पहवा यांना विक्रीची संपूर्ण रक्कम दिली नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. या संदर्भात अद्याप तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button