खेळ

ब्रेकिंग! विराट करणार मोठा धमाका

  1. टीम इंडियासाठी विराट कोहली २०२३ मध्ये सुपरहिट ठरला आहे. विराटने वनडे आणि कसोटीत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून सात शतके झळकावली आहेत. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. दरम्यान उद्यापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दोन हात करताना दिसून येईल. या सामन्यात विराटला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे.
    या सामन्यात कोहलीला श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. तो मोठा रेकॉर्ड मोडण्यापासून केवळ ६६ धावा दूर आहे. हा रेकॉर्ड तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोडू शकतो.
    विराट हा एकाच वर्षात सर्वाधिक वेळेस दोन हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत संगकारा अव्वलस्थानी आहे. संगकारा आणि विराट या दोघांनी मिळून आतापर्यंत संयुक्तरित्या सहा-सहा वेळेस दोन हजार धावांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
    मात्र या ६६ धावा कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातच कराव्या लागणार आहे. कारण हा टीम इंडियाचा या वर्षातील शेवटचा सामना असणार आहे.

Related Articles

Back to top button