अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विष दिल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती खूप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दाऊदला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा अनेक यूजर्संकडून केला जात आहे. अज्ञात व्यक्तीने विष प्राशन केल्याचा दावा केला जात आहे. परिणामी दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने याबद्दल माहिती दिली की, दाऊद गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे आणि त्याला ज्या मजल्यावर दाखल केले आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात. विषबाधेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.