क्राईम

ब्रेकिंग! राज्यातील रेव्ह पार्टी उधळली

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. ठाणे पोलिसानी घोडबंदर रोड परिसरात ही कारवाई केली आहे. लाखो रुपयांचे अवैध सामान पोलिसांनी जप्त केले आहे.
सदर कारवाई रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये 90 युवक आणि 5 महिला यांचा समावेश आहे. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. छाप्यात पोलिसांना चरस अणि गांजा तसेच एमडी ड्रग सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजता वडवली खाडीकिनारी ही रेव्ह पार्टी चालू होती. छाप्यादरम्यान या ठिकाणी जमलेले 90 पुरुष, 5 महिला दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत cनाचत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन तेजस अनिल कुबल, सुजल महादेव महाजन यांनी केले होते.

Related Articles

Back to top button