खेळ

ब्रेकिंग! टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच टीम इंडियाला खुशखबर

सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची T-20 मालिका खेळली जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना मंगळवारी गुवाहाटी येथे होणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर भारताच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाईल. टीम इंडियाने जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकला, तेव्हा भारतीय संघाने सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानची बरोबरी केली होती.

टीम इंडियाने पहिला सामना दोन गडी राखून जिंकला होता. त्या सामन्यात 209 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दरम्यान दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 191 धावा करू शकला. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय T20 मधील 135 वा विजय होता.
टीम इंडियाने आतापर्यंत 135 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पाकिस्तान 135 विजयांसह पहिल्या स्थानावर होता, मात्र टीम इंडियाने आता बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने मंगळवारी तिसरा टी 20 सामना जिंकल्यास हा त्याचा 136 वा विजय ठरेल. अशा परिस्थितीत सर्वाधिक टी-20 जिंकणारा टीम इंडिया नंबर वन संघ बनेल.

Related Articles

Back to top button