…तर टीम इंडिया थेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणार
सध्या भारतात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. या स्पर्धेत भारताने अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा संघ आता सेमी फायनलमध्ये गेला आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत.
दरम्यान, या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र राखीव दिवस केव्हा असेल हे कळू शकले नाही. मात्र जर राखीव दिवशीही हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम संघ प्रवेश करेल.
सध्या टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर टीम इंडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना झाल्यानंतर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने येणार आहे. हा सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.