खेळ

ब्रेकिंग! सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित?

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने आता समाप्त झाले असून परिणामी बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. टीम इंडिया , दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघांनी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्येही आमने सामने आले होते. या सामन्यापूर्वी टीम इंडिया दमदार फॉर्ममध्ये होता. मात्र सेमी फायनलमध्ये टॉप ऑर्डरचा फ्लॉप शो आणि धोनीच्या रन आउटमुळे टीम इंडियाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न हुकले होते.
सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आता टीम इंडियाला पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे.
दरम्यान, सेमी फायनलचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाला होम अडवांटेज असणार आहे. तर वानखेडेवर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. १९८७ पासून ते २०२३ पर्यंत टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर २१ सामने खेळले आहेत.
यादरम्यान टीम इंडियाला १२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाची विजयाची सरासरी ५५ टक्के इतकी राहिली आहे.
तर या मैदानावरील न्यूझीलंडचा रेकॉर्ड पाहिला तर न्यूझीलंडने दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ११ वेळेस बाजी मारली आहे.

इथे हि वाचा

Related Articles

Back to top button