एकदम झकास ; पीएफ धारकांना दिवाळी गिफ्ट
ऐन दिवाळीत सोलापूरसह अन्य भागातील पीएफ धारकांना सरकारने खुशखबर दिली आहे. सणासुदीच्या हंगामात देशभरातील सात कोटी पीएफ धारकांना मोदी सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत पेन्शन खात्यावरील व्याज आता पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर 8.15 व्याजदर निश्चित केला असून काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम आधीच जमा झाली आहे. तथापि, खात्यांमध्ये व्याजाची रक्कम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
पीएफची रक्कम हा उत्पन्नाचा मोठा भाग असतो. दरमहा नोकरदारांच्या पगारातून कपात केली जाते आणि भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाते. देशात सुमारे सात कोटी सक्रिय ईपीएफ खाती आहेत. या सात कोटी पीएफधारकांना आता दिलासा मिळाला आहे. दरम्यान तुमच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम आली आहे की नाही, हे तुम्ही लगेच तपासू शकता.
ऑनलाईन असे तपासा- ईपीएफच्या पोर्टलला https://www.epfindia.gov.in/site_en/For_Employees.php येथे भेट द्या. मुख्यपृष्ठावर, सेवा वर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन सूचीमधून कर्मचाऱ्यांसाठी निवडा. सदस्य पासबुक लिंकवर क्लिक करा आणि ते लॉग इन पृष्ठावर नेईल. तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून खात्यात लॉग इन करा. तुम्ही तुमचे खाते तपशील आणि ईपीएफ शिल्लक तुमच्या समोर येईल.