रुद्देवाडी येथे वाल्मिकी चौकाचे उद्घाटन

गीतांजली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रुद्देवाडी येथे अध्यक्ष अण्णाराव करवीर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उ कर्नाटक राज्य कोळी समाज अध्यक्ष संजयकुमार उकली यांच्या हस्ते वाल्मिकी चौकाचे उद्घाटन झाले.
यावेळी सिद्धार्थ कोळी, शेती अधिकारी मुक्तांना करजगी, मंडळ अधिकारी सिद्धाराम जमादार, एपीआय तुकाराम जमादार, अक्कलकोट तालुक्याचे कोळी समाज तालुकाध्यक्ष शरण कोळी, कार्याध्यक्ष अनिल जमादार, सतीश करजगी. भीमण्णा करजगी,कोळी महासंघाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष ऋषिकेश लोणारी, सोमा कोळी, राजू कोळी, रुद्देवाडी येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ बिराजदार, दत्ता कोळी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबू कोळी, नागण कोळी, विजयकुमार जमादार, शेखर जमादार, सिद्धाराम जमादार, सिद्धाराम जमादार, अंबादास जमादार, लक्ष्मीपुत्र जमादार, रुद्देवाडी ग्रामपंचायत मेंबर भिमशा जमादार, अंबादास जमादार इत्यादी कोळी समाज व रुद्देवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.