सोलापूर

ब्रेकिंग! मोहोळचा तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण दरवर्षी साधारण असते, मोहोळ तालुका हा शेतीचे सर्वाधिक क्षेत्र असलेला तालुका आहे, यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. एका बाजूला अजून पेरण्या झालेल्या नाहीत, तर काही भागात पेरण्या झाल्या मात्र पाऊस न आल्याने हातातोंडाशी येणारा घासही हिरवला गेला आहे.

राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश केला आहे, मात्र मोहोळ तालुका त्यातून वगळला आहे. मोहोळ तालुका तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, अशी मागणी भाजप सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

एका बाजूला मोहोळ तालुक्यातील सिंचनाच्या योजना अपूर्ण असल्याने पाण्याची टंचाई असते आणि दुसऱ्या बाजूला यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी हवालदील झालेला असताना राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त यादीत मोहोळचा समावेश झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. परिणामी त्यावरच्या उपाययोजना आणि योजनांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने मोहोळ तालुक्याचा तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी भाजप सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली आहे.

आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी सदैव देवेंद्रजी कटिबद्ध राहिले आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मोहोळ तालुका दुष्काळग्रस्त यातीतून राहिला असला तरीही त्यावर तातडीने माहिती घेऊन मोहोळचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. विम्याची अग्रिम रक्कम सुद्धा दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजींची भेट घेतली आहे, दुष्काळाच्या विषयावरही उपमुख्यमंत्री फडणवीस हे सकारात्मक निर्णय घेतील हा विश्वास आहे.
– विकास वाघमारे
जिल्हा सरचिटणीस, भाजप सोलापूर ग्रामीण

Related Articles

Back to top button