खेळ

वर्ल्ड कप कोण जिंकणार? धोनी हसला आणि म्हणाला…

भारतात सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकून विक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत टीम इंडियाने सात सामने जिंकले आहेत. भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेशी उद्या म्हणजे रविवारी होणार आहे.
तत्पूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक मॅचविनर खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. आयसीसीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापतग्रस्त झाला होता.

गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. हार्दिक दुखापतीमधून बरा व्हावा म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले होते. तेथे हार्दिकच्या फिटनेसची चाचणी सुरू होती. हार्दिक लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना  क्रिडाप्रेमी करीत होते. मात्र, चाहत्यांची ही प्रार्थना कामाला आली नाही.
अखेर हार्दिकला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एक मोठी अपडेट दिली आहे. यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार, असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तो हसला आणि म्हणाला, यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकेल या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. परंतु सध्या टीम इंडिया चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे समझनेवालों को इशारा काफी है असे म्हणत धोनीने भारतीयांची मने जिंकली.

Related Articles

Back to top button