सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! बाईकच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कश आवाज केला

सोलापूर (प्रतिनिधी) एमएच.१३.सीडी.१६७३ या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या कर्कश आवाजाने सायलेन्सर लावून सार्वजनिक रस्त्यावर उपद्रव केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सात रस्ता ते गांधीनगर चौक दरम्यान घडली.ताहेर मोहम्मद हमीदअली शेख (वय-२२,रा.प्रभाकर नगर,नई जिंदगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.अशा आशयाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल सुरेश बेगमपुरे नेमणूक शहर वाहतूक शाखा दक्षिण विभाग यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिली आहे.तपास मपोना वाघमोडे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button