खेळ

भारत – न्यूझीलंड सामन्यात अनोखा विक्रम

वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया वि. न्यूझीलंड या संघामधील सामना काल हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मैदानावर खेळवला गेला. टीम इंडिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ गुणतालिकेवर बरोबरीत असल्याने कालच्या सामन्यात दोन्ही संघामध्ये टेबल टॉपर होण्यासाठीची लढाई झाली आणि भारतीयांच्या अपेक्षांना खरे ठरवत टीम इंडियाने न्यूझीलंडवर जबरदस्त विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते.

क्रिकेटप्रेमी मैदानामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतानाही ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा कोटींच्या संख्येने हा सामना लाइव्ह पाहण्यात आला आहे. ज्यामुळे आजवरचे प्रेक्षक संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले.
काल झालेला सामना सुमारे 3.5 कोटी लोकांनी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिला आहे. तर ज्यावेळी शेवटी टीम इंडिया हा सामना जिंकणार होती. त्यावेळी मैदानावर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत असताना हा आकडा विक्रमी संख्येवर म्हणजेच 4.3 कोटीवर गेला होता.
त्यामुळे आतापर्यंत कधीच इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह कधीच पाहिला नव्हता, जो काल पाहिला गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहुचर्चित असा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना 14 ऑक्टोबरला खेळला गेला. त्यावेळी देखील 3.5 कोटी लोकांनी हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार लाइव्ह पाहिला होता. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याने त्या सामन्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

Related Articles

Back to top button