महाराष्ट्र

बाप रे! मद्यधुंद बसचालकाने उलटी पळवली बस

पुण्यात स्वारगेट पीएमटी स्थानकातून बस पळवून चालक संतोष माने याने सुमारे नऊ जणांना चिरडले होते. त्या अपघातात 37 जण जखमी झाले होते. त्याच मानेच्या बेदरकार गाडी चालवण्याची पुनरावृत्ती आज पुण्यात पुन्हा एकदा झाली. आज पीएमटी बस चालक निलेश सावंतनेही दारु पिऊन उलटी बस चालवून 10 ते 15 वाहनांना धडक देत अनेक वाहनांचे नुकसान केले.

परिणामी 2012 साली घडलेल्या मानेच्या निष्काळजी ड्रायव्हिंगच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सिटी बस उलटी चालवून नागरिकांना घाबरवून सोडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकातील नागरिकांची तारांबळ उडाली.
ही घटना घडल्याने पुणेकर हादरून गेले आहेत. ही घटना पाहून अनेक जणांना संतोषच्या निष्काळजी ड्रायव्हिंगची पुन्हा आठवण झाली.
निष्काळजीपणे बस चालवून नागरिकांचे जीव घेणाऱ्या संतोषप्रमाणेच निलेशनेही दारु पिऊन बस चालवल्याने अनेक वाहनांना त्याचा फटका बसला आहे. निलेशने उलटी बस चालवल्यामुळे 10 ते 12 वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. उलटी बस चालवत वाहनांना धडक देत पुढे जात असल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. निलेश जी उलट बस चालवत होता, त्यावेळी बसमधून 50 प्रवाशी प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून आरोडाओरडा करण्यात येत होता. दरम्यान उलटी बस चालवल्याप्रकरणी निलेश विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button