बनशंकरी मंडळातर्फे गरबा व दांडिया रास

सोलापूर : शेळगी येथील श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने गरबा व दांडिया रास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर रोडगीकर, आधारस्तंभ सुरेश हत्ती, अध्यक्ष दीपक भैरप्पा, उपाध्यक्ष ओंकार देशेट्टी, जगदेवी शेट्टी, सुजाता भुतडा व मंजुश्री भुतडा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शेळगी परिसरातील धनलक्ष्मी दांडिया ग्रुप, बनशंकरी युथ दांडिया ग्रुप, आदिशक्ती दांडिया ग्रुप, बनशंकरी महिला दांडिया ग्रुप, महर्षी गौतम नगर महिला दांडिया ग्रुप, करंजकर दांडिया ग्रुप, महर्षी गौतम नगर कुमारी दांडिया ग्रुप या दांडिया ग्रुपसह चारशे महिला, युवती व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रुतिका जाधव हिने केले. स्पर्धेचे परीक्षण सुजाता भुतडा व मंजुश्री भुतडा यांनी केले. स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्रफुल शेट्टी, अजय चारी, सुजित महामुनी, महेश होटकर, योगेश मानशेट्टी, अनिकेत जाधव, मंदार चारी, काशिनाथ होटकर, वेदांत पवार यांनी परिश्रम घेतले.