खेळ

ब्रेकिंग! यंदा वर्ल्डकप कोण जिंकणार ? उत्तर मिळाले

सध्या टीम इंडियाचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत अतिशय दमदार कामगिरी करत आहे. भारतात वर्ल्डकप असल्याने टीम इंडियालाच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. सुरुवातीच्या तीनही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी सुंदर खेळ केला आहे.

यंदा १९८३ वर्ल्डकप स्पर्धेतील काही सुखद योगायोग जुळून आले आहेत. ज्यामुळे टीम इंडिया वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची ट्रॉफी उंचावणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
टीम इंडियाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध पार पडला. या सामन्यात टीम इंडियातील सलामीवीर फलंदाज शून्यावर बाद झाले होते. १९८३ वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात देखील टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज शून्यावर बाद झाले होते.
वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. या संघाने पाच वेळेस वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. परिणामी ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. टीम इंडियाने १९८३ आणि २०११ मध्ये झालेल्या स्पर्धेतही बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. २०२३ वर्ल्डकप स्पर्धेतही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.
गेल्या दोन स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर,आयसीसीच्या रँकिंगमध्ये नंबर एकला असलेल्या संघाने वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. २०१५ वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला होता. त्यानंतर २०१९ वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापू्र्वी इंग्लंडचा संघ आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वलस्थानी होता. या स्पर्धेत इंग्लंडने वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. आता टीम इंडिया देखील नंबर एकला आहे. त्यात वर्ल्डकप स्पर्धा भारतातच सुरू आहे. त्यामुळे टीम इंडियासोबतही हा योगायोग जुळून आला तर, टीम इंडिया नक्कीच तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावू शकतो.

Related Articles

Back to top button