सोलापूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेळगी ब्रीज येथील सर्व्हिस रोड करण्याचा मार्ग मोकळा झाला असून या रोडवर अडथळा ठरणारे आशाबाई अंकुश नागटीळक व इतर रहिवाश्यांनी केलेले अवैध बांधकाम त्यांनी स्वतःहून काढून घेण्याची उच्च न्यायालयाने दिलेली मुदत शुक्रवारी संपली आहे. दरम्यान, महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाच्या मार्फत येत्या चार दिवसात पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण पाडकाम करण्यात येणार आहे.
येत्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व सोलापूर महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून या सर्व्हिस रोडवर अडथळा ठरणारी अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई चार दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर हा सर्विस रोड अखेर खुला होणार आहे.
पुणे – सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी कडून साखळी क्र. 250+700 TO 250+ 900 डाव्या बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या पत्रानुसार सोलापूरातील विद्यानगर भाग-2, क्रमांक 493 प्लॉट क्र.33 चे बांधकाम बेकायदेशीर असून सदरचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 च्या सर्व्हिस रोडवर करण्यात आले आहे.
श्रीमती आशाबाई अंकुश नागटिळक व इतर नागरिकांनी सर्व्हिस रोडवर अवैध बांधकाम केले आहे. रुपाभवानी मंदिर ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. ही जागा सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली असल्याचे नागरिकांना यापूर्वीच कळवण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्ग सर्व्हीस रोडवर करण्यात आलेले अवैध बांधकाम तेथील नागरिकांनी स्वतःहुन काढून घेण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी जागा रिकामी करावी, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पत्रात नमूद केले होते.
दरम्यान, नागरिकांनी हे अवैध बांधकाम मुदतीत पाडले नसल्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून येत्या चार दिवसानंतर पाडण्यात येणार आहे.
इथे हि वाचा
SBI बँकेतून प्रत्येक महिन्याला कमवा 24000 रुपये