महाराष्ट्र

ब्रेकिंग! भरधाव ट्रकने बाईकला उडवले

 

अलीकडे सोलापुरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एपी टर्मिनल जवळ झालेल्या या अपघातात अपघातग्रस्त बाईकचा चुराडा झाला आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. भरधाव ट्रकने बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला.

पुण्याहून लोणी काळभोरकडे येत असलेल्या बाईकला ट्रकने टक्कर दिल्याने त्यात गणेश हवालदार आणि त्याचा मित्र आदित्य साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात सातत्याने अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणीतल्या मुख्य रस्त्यावर एका कारला भीषण अपघात झाला होता.

इथे हि वाचा

SBI बँकेतून प्रत्येक महिन्याला कमवा 24000 रुपये

खाजगी आणि सरकारी बँकांना तब्बल 9 दिवस बंद!

अटल बांधकाम कामगार आवास योजना

Related Articles

Back to top button