खेळ

इंडिया जोमात, पाकिस्तान कोमात

वनडे वर्ल्डकप स्पर्धे दरम्यान पाकिस्तान संघाला तगडा झटका बसला आहे. कारण पाकिस्तान संघातील अनेक स्टार क्रिकेटर्स व्हायरल फिव्हरला बळी पडले आहेत. पाक संघाच्या चार ते पाच खेळाडूंना ताप आणि व्हायरल संसर्ग झाला आहे.

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात पाकला टीम इंडियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून पाकिस्तान संघाच्या क्रिकेटपटूंना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. यातच आता, पाकिस्तानला आपला पुढचा सामना शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये खेळायचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला हा तगडा झटका बसला आहे.
यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाक संघाची तयारी विस्कळीत झाली आहे, कारण अनेक प्रमुख खेळाडू व्हायरल फिव्हरला बळी पडले आहेत. परिणामी या स्पर्धेत पाकिस्तान संघाला आणखी धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व्हायरल बॅक्टेरियाच्या संसर्गाला बळी पडला आहे. शाहीनने प्रकृती सुधारण्यासाठी अँटीबायोटिक ड्रिप आणि वैद्यकीय मदत घेतली आहे.

तसेच पाक संघाचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक यालाही प्रचंड ताप आला आहे. याशिवाय पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज जमान खान देखील व्हायरल संसर्गाने बाधित झाला असून यामुळे पाक संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच पाक संघाचा लेग स्पिनर उसामा मीर हा देखील व्हायरल संसर्गामुळे प्रभावित झाला आहे.

Related Articles

Back to top button