खुशखबर! चांद्रयान-3 च्या यशानंतर मोठी घोषणा
भारतात अलीकडेच चांद्रयान थ्री ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली आहे. भारताने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. सोलापुरातही फटाक्यांची आतषबाजी करत शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान आता याच चांद्रयान थ्री मोहिमेबद्दल आणखी एक अपडेट समोर येत आहे.
आदित्य एल १ आणि चांद्रयान ३ मोहिमेच्या जबरदस्त यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता गगनयान मोहिमेची मोठी तयारी करत आहे. याच महिन्यात या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. भारताचे संशोधक पहिल्यांदाच अंतराळात जाणार असल्यामुळे भारतासह जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
दरम्यान गगनयान ही भारताची पहिलीच अंतराळ मोहीम असून इस्रो २१ ऑक्टोबरला या मोहिमेतील अबॉर्ट मिशन -१ चे प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूलची पहिली अबॉर्ट चाचणी या महिन्यात घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मोहिमेच्या यशानंतरच पुढील दिशा आणि योजना आखली जाणार आहे.
पृथ्वीपासून १७ किमी उंचीवर चाचणी करण्यात येणाऱ्या यानापासून क्रू मॉड्युल वेगळे होण्याची अपेक्षा आहे. या चाचणीत क्रू मॉड्युलचे लॉन्च व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. त्यांनतर ठराविक उंची गाठल्यानतर क्रू मॉड्युल वेगळं होईल. अबॉर्ट मिशन पूर्ण केल्यानंतर ते बंगालच्या उपसागरात लँड होईल. त्यांनतर नौदलाकडून हे क्रू मॉड्युल ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच गगनयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ‘व्योमीत्र’ हा रोबोट अंतराळात पाठविण्यात येणार आहे.