खेळ

खुशखबर! ऐन वर्ल्ड कपमध्ये आनंदाची बातमी

यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळला जात आहे. दरम्यान  लॉस एंजेलिस येथे होणार्‍या २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याची अधिकृत घोषणा मुंबईत करण्यात आली आहे. ऑलिम्पिक गेम्समध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल.
क्रिकेटशिवाय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि फ्लॅग फुटबॉल यांचाही ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्समध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तवाच्या बाजूने ९९ पैकी ९७ सदस्यांनी मतदान केले तर केवळ दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले.
यानंतर आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा इतर खेळांसोबत समावेश झाल्याची घोषणा केली आहे. दरम्यान १९०० सालानंतर प्रथमच ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन क्रिकेट संघ होते. त्यावेळी इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला होता.

Related Articles

Back to top button