वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो बहुप्रतिक्षित सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अगदी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्या दरम्यान संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. सामना पाहण्यासाठी जवळपास १.३० लाख प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते.
दरम्यान मैदानावर सामन्याची क्रेझ सुरू असतानाच, ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील विक्रमी संख्येने लोकांनी टीम इंडिया -पाकिस्तान महामुकाबला लाईव्ह पाहिला गेला.
या विश्वचषकाच्या सामन्याने प्रेक्षक संख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले गेले. हॉटस्टारवर तीन कोटींहून अधिक लोक टीम इंडिया – पाकिस्तानचा सामना एकाच वेळी लाईव्ह पाहत होते. हॉटस्टारने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ३.१ कोटी लोक एकाच वेळी हा सामना लाईव्ह पाहत होते. मात्र, नंतर हा आकडा आणखी वाढत गेला. वास्तविक, वर्ल्डकप सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याशिवाय चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
डिस्ने प्लस हॉटस्टार म्हणजेच OTT वर भारत-पाकिस्तान सामना ३.५ कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह पाहिला नव्हता.