खेळ

ब्रेकिंग! वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला पुन्हा खुशखबर

यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. दरम्यान भारतीय संघाचा तिसरा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.
या सामन्यापूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आता आयसीसीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलची सप्टेंबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. 
गिलने गेल्या महिन्यात दमदार कामगिरी केली. या दरम्यान त्याने ८० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आहेत. आशिया चषकात त्याने ७५.५ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या २ वनडे सामन्यांमध्ये त्याने १७८ धावा चोपल्या होत्या. याच दमदार खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button