खेळ

बलाढ्य ऑस्ट्रेलियाने क्रिकेटमध्ये लाज घालवली; नकोसा विक्रम केला

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जगातील सर्वात मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. खास करून आयसीसी इव्हेंट्समध्ये ऑस्ट्रेलिया ( कांगारू) संघ एका वेगळ्याच अंदाजात खेळताना दिसतो. कांगारू संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करतो. पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये कांगारू टीम अतिशय निराशाजनक कामगिरी करत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना टीम इंडियाविरुद्ध गमवावा लागला. यानंतर काल ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनौत खेळला. या सामन्यातही ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. यामुळे आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर ३१२ धावांचा डोंगर उभारला. 
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव झाला. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी काल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे सहा अतिशय सोपे झेल सोडले. यामुळे आता कांगारू संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. चाहते कांगारू संघाला प्रचंड ट्रोल करत आहेत. 

ऑस्ट्रेलियन खेळाडू हाताला बटर लावून क्षेत्ररक्षणासाठी आले होते की काय, असे टोमणे सोशल मीडियावरील चाहते मारत आहेत. विशेष म्हणजे, टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शने विराट कोहलीचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना हिसकावून घेतला होता.

Related Articles

Back to top button