खेळ

एकच नंबर! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने विश्वचषकातील ७ वे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता.
दरम्यान अफगाणिस्तान विरुद्धाच्या सामन्यात रोहितने ६३ चेंडूमध्ये शतकी खेळी केली. या खेळीसह रोहितने कपिल देवच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. कमी चेंडूत शतक करण्याचा विक्रम कपिल देवाच्या नावावर होता.
कपिल देव यांनी ७२ चेंडूमध्ये शतक ठोकले होते. कालच्या खेळीत रोहितने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शतक ठोकले.
दरम्यान या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारताने केवळ 35 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. तर विराट कोहली 56 चेंडूत 55 धावा करून नाबाद राहिला. त्याने 35 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Related Articles

Back to top button