देश - विदेश

वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी पकडले?

अलीकडे वाहतुकीचे खूप कडक नियम लागू करण्यात आले आहे परंतु, त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येते. कोणत्याही रस्त्यावरुन प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे.
आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यानंतर आपण खूप घाबरतो. कित्येक वेळा नियमांचे पालन करुनही वाहतूक पोलीस दंड आकारतील, असा गैरसमज देखील केला जातो.  

जर तुम्ही बाईक ड्रायव्हिंग करत असाल आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, कागदपत्रे नाहीत अशावेळी काय कराल? कायद्यामध्ये याबाबत कोणती तरतूद आहे, याबाबत कायदेतज्ज्ञ अमित शिंदे यांनी सांगितले, बाईक किंवा चारचाकी चालवताना एखाद्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले आणि कागदपत्रे नसतील तर घाबरुन जाऊ नका. 

अशावेळी सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल्सच्या १३९ नियमानुसार आपल्या वाहनांचे कागदपत्रे एखाद्या वर्दीतील ट्रॅफिक पोलिसांनी मागितले तर, त्यांना देऊ शकतो. परंतु, जर आपल्याकडे गाडीची कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक, पीयूसी प्रमाणपत्र. त्यावेळेला नसतील तर आपण त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये डिजी लॉकरमधून ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकतो.
 जर तुमच्याकडे बाईकची कागदपत्रे नसतील तर पंधरा दिवसांच्या आतमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे मागितली, त्यांना आपण रजिस्टर पोस्टाने त्याची पत्र पाठवू शकतो. आपल्याकडे कागदपत्रे असताना देखील दंड घेतला असेल तरीसुद्धा पंधरा दिवसांच्या आत आपण त्याची प्रत रजिस्टर पोस्टाने पाठवली तर आपला दंड रद्द होऊ शकतो. त्यामुळे बाईक चालवताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Related Articles

Back to top button