राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार?

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तीवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले.
यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी घेतली होती.
त्यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी घेऊ, असे सांगितले होते. आज म्हणजेच बुधवारी ठाकरे गटाच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.