सोलापूर

सोलापूर शॉकिंग! केवळ 25 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्ये हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅकचे प्रमाण अलीकडे खूप वाढत आहे. हार्टअटॅकच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच्या सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. 

दरम्यान, हृदयविकाराचे वाढते प्रमाण समाजासाठी चिंताजनक आहे. विशेषता तरुण तरुणींमध्ये हे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गणेश सायबणा घंटे असे मृत्युमुखी पावलेल्या तरुणाचे नाव आहे. 
त्याचे वय केवळ 25 होते. सोलापुरातील शेळगी परिसरातील परिसरातील नंदिकेश नगर येथे तो राहत होता. तो एका दुकानात कामाला होता. दरम्यान आज सकाळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असताना नियतीने डाव साधला आणि गणेश मृत्युमुखी पडला. गणेशच्या अचानक जाण्याने घंटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
गणेश याच्या पश्चात आई -वडील, दोन बहिणी व पत्नी असा परिवार आहे. दुर्दैवाची म्हणजे गणेश याचे केवळ चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या गणेशच्या पत्नीला या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. 

Related Articles

Back to top button