खेळ
पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी
- पाकिस्तानची स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बास क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतात आली होती. पण, आता ती भारत सोडून दुबईला परतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.
सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्मावर टीका करणे, यांसारख्या विषयांमुळे जैनब वादात राहिली आहे. आता याच काळात तिचे अनेक जुने ट्विट व्हायरल झाले होते, ज्यात ती भारत आणि हिंदू धर्माबद्दल वाईट बोलताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या ‘समा टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या एक्स अकाऊंटनुसार जैनबने भारत सोडला आहे. जैनबने सुरक्षेच्या कारणास्तव भारत सोडला. ती सध्या दुबईत आहे. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारतविरोधी ट्विट केल्याचे गंभीर आरोप आहेत.