खेळ
मोठी बातमी : रोहित शर्माला डच्चू जवळपास निश्चित

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येणार असे वृत्त आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीतील दारुण पराभव आणि सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असल्याने रोहितला वगळण्यात येणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी तीन जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या सामन्यासाठी बुमराह कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.