महाराष्ट्र
धादांत खोटे आरोप! दमानियांच्या ‘त्या’ खळबळजनक दाव्याचे काय झाले?

- धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना जवळपास 245 कोटींचा घोटाळा केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. दमानिया यांच्या या आरोपांना आता मुंडे यांनी उत्तर दिले आहे. दमानिया यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणारे हे आरोप आहेत, असे मुंडे यांनी म्हटले.
- दमानिया यांनी ज्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला ती निविदा प्रक्रिया नियमाप्रमाणे आणि शासनाच्या नियमांना धरुनच राबवली गेली होती. मागील अनेक दिवसांपासून त्या वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यातला एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही, असेही मुंडे यांनी म्हटले. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांपैकी फरार आरोपीची हत्या झाल्याचाही आरोप दमानिया यांनी केला होता. त्याचे काय झाले? तो दावा बिनबुडाचा ठरला. त्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचे नंतर समजले. असे सनसनाटी आरोप करायचे आणि स्वत:ची प्रसिद्धी करायची आणि दुसऱ्याची बदनामी करायची. आज केलेल्या आरोपांतही मला दुसरे काही आढळून येत नाही. आज 58 वा दिवस आहे माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. का सुरु आहे? कोण चालवतेय मला माहिती नाही, असे मुंडे म्हणाले.