महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेतून लाखो लाभार्थी पडणार बाहेर?
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत लाखो लाभार्थी बाहेर पडतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
- तुमच्या कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही अशी माहिती आहे. दरम्यान, या योजनेत सुरुवातीला सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. निकषांना जास्त महत्व दिले गेले नव्हते. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली. परंतु, आता या निकषांनुसारच लाभ देण्याचे राज्य सरकारने निश्चित केल्याचे दिसत आहे.
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. यावेळी सरकारी यंत्रणांनी देखील कोणतीही तपासणी न करता सरसकट अर्ज मंजूर केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली. सरकारी तिजोरीवरील ताणही वाढला. राज्य सरकार दरमहा चार हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च करत आहे.
- इतके पैसे फक्त एकाच योजनेवर खर्च होत असल्याने महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. याचे भान आता सरकारला येऊ लागले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.