सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! श्रद्धाचा भयंकर कांड
- सोलापूर (प्रतिनिधी) सेवानिवृत्त शिक्षकाच्या फोन पे वरून परस्पर रक्कम पाठवल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ते ३ मे २०२४ दरम्यान या कालावधीमध्ये लक्ष्मी हाईट्स जगदंबा नगर जुळे सोलापूर येथे घडली. याप्रकरणी तनवीर यासीन सय्यद (वय-४३,रा.सुविधा टॉवर,पूजा नगर रोड,मिरा रोड,मुंबई) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
- त्यांच्या फिर्यादीवरून श्रद्धा मंगेश मलखारे (रा.लक्ष्मी हाईट्स,जगदंबा नगर, जुळे सोलापूर) हिच्याविरुद्ध दि.३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१९ मार्च २०२४ पासून फिर्यादी यांचे मयत वडील हे वरील संशयित आरोपी हिच्या घरी राहत होते. दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादी यांच्या वडिलांची अचानक तब्येत खराब होऊन मयत झाले. फिर्यादी यांच्या वडील वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकवरून तीन लाख रुपये फिर्यादीस तसेच फिर्यादीच्या आईस न सांगता श्रद्धा हिने स्वतःच्या फायद्याकरिता फिर्यादीच्या परवानगीशिवाय पैसे घेतले आहे. असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास दुमपोनि.पाटील या करीत आहेत.