देश - विदेश

ब्रेकिंग! राजीव, राहुल आणि केजरीवाल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिले. या भाषणात मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केले.
  • मोदींनी सांगितले, गेल्या पाच दशकात आपण फक्त ‘गरिबी हटाव’ च्या घोषणा ऐकल्या आहेत. पण, आम्ही गरिबांसाठी घोषणा दिल्या नाहीत. त्यांचा खरा विकास केला. 
  • आमच्या सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलेआहे. जमिनीशी जोडलेली माणसे जमिनीवरील सत्यता ओळखून आपले आयुष्य जमिनीवर घालवतात, तेव्हा जमिनीवर बदल निश्चित घडतो. आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन म्हणण्याची सवय झाली होती. त्यांनी एक अडचण ओळखली होती. त्यांनी सांगितले होते की, दिल्लीमधून एक रुपया निघतो त्यामधील 15 पैसे गावापर्यंत पोहोचतात. 
  • त्यावेळी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत एकाच पक्षाचे राज्य होते. पण, अद्भूत हाथ सफाई होती. 15 पैसे कुणाकडे जात होते ते तुम्ही सहज ओळखू शकता. दरम्यान देशाने आम्हाला संधी दिली. आम्ही उत्तर शोधण्याचे काम केले. आमचे मॉडेल बचत आणि विकास आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आहे. 

Related Articles

Back to top button