महाराष्ट्र

टकलू हैवान, महामूर्ख…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांनी सोलापूरकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरकरने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटले ही दंतकथा आहे. त्यावेळी पेटारे वगैरे काही नव्हते, असे सोलापूरकर एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठं आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

राहुल सोलापुरकर याने आपण टकलू हैवान असल्याचे सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान हे आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button